बाबा रामदेव मुळे झाल्या बदल्या जाणून घ्या काय आहे सावळा गोंधळ | Baba Ramdev Controversy Latest

2021-09-13 312

मिहानमधील रामदेव बाबा यांच्या फूड पार्कला जमीन देण्यासंदर्भातील कागदपत्रे माहिती अधिकारावरील सुनावणी दरम्यान मुख्य आयुक्त रत्नाकर गायकवाड यांच्या समक्ष सादर करणाऱ्या दोन अधिकाऱ्यांची महाराष्ट्र विमातनळ विकास कंपनीने बदली केल्याचे प्रकरण समोर आले आहे.
एमएडीसीने रामदेव बाबा यांच्या पतंजली उद्योग समूहास मिहानमध्ये फू ड अँड हर्बल पार्कसाठी ६०० कोटी रुपयांची जमीन अल्पदरात दिली होती. येथे एक एकर जमिनीचे दर १०० कोटी रुपये असताना कंपनीने रामदेव बाबा यांना २५ लाख रुपये प्रती एकर या दराने जमीन दिली. ही बाब कागदपत्रे बाहेर आल्यानंतर समोर आली होती. या घडामोडीनंतर १२ दिवसांनी एमएडीसीचे विपणन व्यवस्थापक व जनमाहिती अधिकारी अतुल ठाकरे आणि समीर गोखले यांची बदली करण्यात आली.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Videos similaires